अग्निहोत्र म्हणजे काय?
अग्निहोत्र म्हणजे काय, तर सोप्या भाषेत अग्नी मध्ये हवन. अग्नी व सूर्य देवाला दिलेली आहुती म्हणजेच अग्निहोत्र. हा यज्ञविधी आपल्या घरी नित्यनेमाने सकाळ व संध्याकाळी करायचा असतो. स्थानिक वेळेनुसार सूर्योदय व सूर्यास्त या वेळेला हा विधी करावयाचा असतो. या विधीमध्ये सकाळी सूर्य आणि प्रजापती यांना आणि संध्याकाळी अग्नी व प्रजापती यांना उद्देशून गाईच्या तुपात मिसळलेले अखंड तांदळाची आहुती अग्नीमध्ये अर्पण करण्यात येते. तसेच अग्निहोत्र इतर यज्ञांच्या तुलनेने अतिशय सोपा यज्ञ आहे. पूर्वीच्या काळी अग्निहोत्री आडनाव असणारे व्यक्ती ह्या नित्य नियमाने अग्निहोत्र हे कर्म करत असत . त्यामुळे वातावरणामध्ये पवित्र स्पंदने निर्माण होऊन , तापमान एकसमान राहण्यास मदत होते.
अग्नीहोत्र सकाळ व संध्याकाळ का करावे ?
जेव्हा रात्र संपून सूर्योदय होत असताना म्हणजेच एक प्रहर संपून दुसरा प्रहर सुरु होत असताना जो मधला काळ असतो ह्या काळाला संधी काळ असे म्हणतात. ह्या काळात वातावरण मध्ये विषारी जीवजंतूंचे प्रमाण हे मोठ्या प्रमाणावर वाढलेल असतं. या वेळेत अग्निहोत्र केल्याने, अग्नीहोत्रतून निर्माण होणाऱ्या धुराचा वातावरणात तयार होणाऱ्या रोगजंतूवर व सुश्मजंतूंच्या वाढीवर प्रतिबंध मिळवला जातो. व वातावरणातील बदलांवर नियंत्रण मिळवले जाते. तांब्याच्या पिरॅमिड आकाराचा अग्निहोत्र पात्रात, विधी केल्याने उष्णता आणि विद्युत-चुंबकीय ऊर्जेचे तरंग निर्माण होतात. त्यामुळे वातावरणामध्ये, शुभ लहरी प्रस्थापित होण्यास मदत होते. व वातावरणामध्ये सत्व गुणांची वाढ होऊन रज आणि तम गुण कमी करण्यात येतो. तसेच वातावरणातील पंचतत्वांचा समतोल साधला जातो. वायू प्रदूषण, नैसगिर्क चक्राचे होणारे असंतुलन या सर्वांवर नियंत्रण मिळवण्याचे सामर्थ्य अग्निहोत्रात आहे. म्हणून अग्नीहोत्र सकाळ व संध्याकाळ करणे आवश्यक आहै.
अग्नीहोत्र करण्याने मिळणारे फायदे
नित्य अग्निहोत्र आचरणाने , घरातील वातावरण शुद्ध व पवित्र राहते. त्यामुळे कुटूंबातील सदस्य हे एकमेकांशी समंजसपणे बांधले जातात व घरातील वास्तू दोष हा कमी होतो.
अग्नीहोत्रामुळे वातावरणातील ताणतणाव दूर होऊन मन प्रसन्न राहते. त्यामुळे आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती टिकून राहण्यास मदत होते.
अग्निहोत्राच्या आचरणाने मानवामध्ये शरणागत वृत्ती निर्माण होऊन मन प्रेममय आणि अनासक्त बनते.
अग्निहोत्राच्या उपासनेमुळे सर्व देवतांची उपासना केल्याचे फल मिळते.
अग्निहोत्राच्या ज्वलनातून तयार होणाऱ्या भस्माचा वापर, शेतीमध्ये केल्यास वनस्पती वाढीवर उत्तम परिणाम होतो. परिणामतः अधिक सकस आणि स्वादिष्ट अन्नधान्य पिकवले जाते.
अग्निहोत्र भस्माचा वापर अशुद्ध पिण्याच्या पाण्यात केला असता . पाण्यातील जंतू व क्षाराचे प्रमाण कमी होण्यास मदत मिळते.

घरी अग्निहोत्र कसे करावे?
अग्निहोत्र करण्यासाठी खालील गोष्टी ह्या आपल्या जवळ असाव्या लागतात
१.तांब्याची पिरॅमिड पद्धतीचे हवन पात्र
२. गाईचे तूप
३. गाईच्या शेण्याचा ( गोवऱ्या )
४. अखंड तांदूळ
५.भीमसेन कापूर
६. गाईच्या तुपात मिसळलेले कापसाची फूल वात
सकाळी अग्निहोत्र
प्रथम चार शेणीचे तुकडे घेऊन त्यांना गाईचे तूप लावून घ्यावे नंतर दोन शेणाचे तुकडे आडवे आणि दोन तुकडे उभे ठेवावेत जेणेकरून तांब्याच्या पात्राच्या मध्यभागी एक पोकळ जागा तयार होईल. मधल्या पोकळ जागे मध्ये भीमसेनी कापराचा बारीक चुरा हा पसरवून ठेवावा व त्यावर गाईच्या तुपात मिसळलेले कापसाची फूल वात ठेऊन द्यावी. एखादया ताटली मध्ये गाईच्या तुपात भिजवलेले तांदूळ दाणे घ्यावे .त्यानंतर सूर्योदयाचे वेळी प्रथम गाईच्या तुपात मिसळलेले कापसाची फूल वात हि पेटवून गाईच्या तुपात भिजवलेले तांदळाचा दाण्याची प्रथम आहुती देऊन पुढील मंत्राचा उच्चार करावा .
सूर्याय स्वाहा:। सूर्याय इदम् न मम॥
त्यानंतर पुन्हा उर्वरित तांदळाचा दाण्याची आहुती देऊन पुढील मंत्राचा उच्चार करावा
प्रजापतये स्वाहा:। प्रजापतये इदम् न मम॥
व त्यानंतर पाच मिनिटे शांतपणे अग्निसमोर बसणे व अग्नीवर लक्ष केंद्रित करणे.
संध्याकाळ अग्निहोत्र
ह्या वेळी वर दिलेली अग्निहोत्राची सांगितलेली मांडणी करून प्रथम आहुती देणे व पुढील मंत्राचा उच्चार करावा.
अग्नेय स्वाहा:। अग्नेय इदम् न मम॥
त्यानंतर उर्वरित तांदळाचा दाण्याची आहुती देऊन पुढील मंत्राचा उच्चार करावा
प्रजापतये स्वाहा:। प्रजापतये इदम् न मम॥
थोडक्यात सूर्योदयाचा वेळी अग्निहोत्र करावयाचे असल्यास पुढील मंत्र म्हणावे लागतात.
सूर्याय स्वाहा:। सूर्याय इदम् न मम॥
प्रजापतये स्वाहा:। प्रजापतये इदम् न मम॥
सूर्यास्ताच्या वेळी अग्निहोत्र करावयाचे असल्यास हे मंत्र म्हणावे लागतात.
अग्नेय स्वाहा:। अग्नेय इदम् न मम॥
प्रजापतये स्वाहा:। प्रजापतये इदम् न मम॥
अश्याप्रकारे आपण घरचा घरी अग्नीहोत्र हा यज्ञविधी करू शकता .अग्नीहोत्र कसे करावे याबद्दल आपल्याला सविस्तर माहिती पहायची असल्यास खाली दिलेल्या व्हिडीओ ला क्लिक करून पाहू शकता. अग्निहोत्रकिट आपण आमचा वेबसाईट वरून किंवा दिलेल्या व्हॉट अँप नंबर वरून मागवू शकता.
वास्तुशाश्त्रानुसार आपल्या घराचे परीक्षण करून घेण्यासाठी किंवा नवीन घराचा प्लॅन काढून घेण्यासाठी ,आपण आम्हाला खाली दिलेल्या नंबर वर संपर्क साधू शकता.
धन्यवाद , श्री. मनोज श्रीमंत ताजणे 91366 38039