कोहळा ह्या फळाला वास्तुशाश्त्रामध्ये महत्व का दिले आहै

कोहळा ह्या फळाचे अध्यात्मिक महत्व ?

आपण जर पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की , पूर्वीचा      काळी आपल्या घराचे  नकारत्मक गोष्टीपासून रक्षण  करण्यासाठी घराचा  मुख्य दरवाजावर कोहळा हा टांगला जात असे . बदलत्या काळानुसार तंत्रज्ञान किती ही विकसीत झाले असले तरी ही अनेक अश्या गोष्टी विज्ञानाच्या पलीकडे विचार करण्यास भाग पाडतात. अर्थातच त्यातील एक फळ  म्हणजे कोहळा.                                                                

कोहळ्याला संस्कृत मध्ये कुष्माण्ड असे म्हणतात . नवरात्रीच्या चौथ्या दिवशी देवीच्या कुष्मांडा या रुपाची आराधना केली जाते. कुष्मा म्हणजे तप्त आणि अण्ड म्हणजे संसार, विश्वा्तील विविध तापातून  संसाराचे रक्षण करणारी देवीशक्ती म्हणजेच कुष्माण्डा होय. देवीला कोहळा हा  विशेष आवडतो. म्हणून चण्डीयागाच्या वेळी होमहवनात कोहळा अर्पण केला जातो. त्याचप्रमाणे कोहळ्याचा उपयोग हा तांत्रिक आणि मांत्रिक अशा दोन्ही कामात केला जातो .                         

कोहळा हे एका वनस्पतीचे फळ असून , भूतलावर  दोन फळांना अमरत्व प्राप्त आहै. एक म्हणजे कोहळा आणि दुसरे फळ म्हणजे गोरक्ष चिंच . परंतु कोहळा लावण्या मागचं कारण हे कि कोहळा हा  बाजारामध्ये  सहज  रीतीने उपलब्ध होते . या उलट गोरक्ष चिंच हि दुर्मिळ असल्या कारणाने ती सहज उपलब्ध होत नाही. म्हणून तिचा वापर हा कमी प्रमाणात केला जातो . त्यामुळे  कोहळा हा मोठ्या प्रमाणावर मुख्य दरवाजावर टांगलेला आपल्याला दिसतो.  

कोहळा

घराचा मुख्य दरवाजावर कोहळा का टांगावा ?

आपल्या घराची हद्द हि आपल्या घराचा मुख्य दरवाजा पासून सुरु होते . वस्तूचा मुख्य दरवाजा हा नेहमीच महत्वाची भूमिका हि बजावत असतो. बाहेरील नकारात्मक किंवा सकारात्मक ऊर्जा हि वस्तूचा मुख्य दरवाजा मधून प्रवेश करते . जर बाहेरील प्रवेश करणारी व्यक्ती  आपल्या बद्दल जर ईर्षा बाळगून असेल तर तिचा  मनातले भाव नकारात्मकते  मधे बदलतात. अशी नकारात्मक व्यक्ती जेव्हा आपल्या घराच्या मुख्य दरवाजा मधून प्रवेश करते. व घरातील ऊर्जा बिघडण्यास कारणीभूत ठरते व त्याचा परिणाम घरात राहणाऱ्या व्यक्तिवर दिसून येतो .      

घरातील व्यक्तींमध्ये विनाकारण भांडणे होणे, व्यवसायात अडचणी येणे, आजारपण वाढणे , प्रगती मध्ये अडथळे येणे. हि लक्षणे आपल्याला दिसून येतात . यावर उपाय म्हणून घराचा मुख्य दरवाजा वरती कोहळा लावणे . कोहळ्यामध्ये नकारात्मक शक्ती शोषून घेण्याची ताकद ही  निसर्गतः मोठया  प्रमाणावर असते .  वास्तूच्या मुख्य दरवाजा मधून प्रवेश करणारी  नकारात्मक शक्ती मनुष्य ओळखण्यास असमर्थ आहे. हि नकारात्मक  शक्ती ओळखण्याची ताकद कोहळा या फळामध्ये  सामावलेली आहै.  म्हणूनच  या फळाला असाधारण महत्व वास्तूमध्ये प्राप्त झाले आहे.  म्हणूनच घराचा मुख्य दरवाजावर कोहळा का लावला गेला पाहिजे . 

त्याचप्रमाणे या फळाला अमरत्व प्राप्त असल्याने हे फळ कित्येक दिवस खराब होत नाही. जेव्हा वातावरणामध्ये नकारात्मकता मोठ्या प्रमाणावर वाढते तेव्हा हे फळ खराब होते कित्येकदा असं पाहण्यात आला आहे की , मुख्य दरवाजावर हे फळ टांगल्या नंतर लगेच खराब होते अशावेळी आपण घाबरून न जाता आपल्या लक्षात येईल कि , त्या घरातील नकारात्मक शक्ती ही मोठ्या प्रमाणावर वाढलेली आपण ओळखू शकतो किंवा कित्येक वेळी हे फळ सहा सहा महिनेही खराब होत नाही यावरून आपण घरामध्ये असणारी ऊर्जा हि कश्या प्रकारे आहै हे ओळखण्यास मदत होते

घराचा मुख्य दरवाजावर कोहळा कशाप्रकारे टांगावा ?

देठ असणारा कोहळा खरेदी करावा नंतर तो स्वच्छ पाण्याने धुऊन  आपल्या देवघरामध्ये किंवा पूजा करणाऱ्या ठिकाणी लाल वस्त्र वरती ठेवून त्यावर अष्टगंधाने ओम, त्रिशूल किंवा स्वस्तिक यापैकी एखादे  प्रतीक  काढावे , काढून झाल्यानंतर त्यावरती अगरबत्तीने विषम संख्येमध्ये ओवाळून त्यावर हळदी कुंकू हे वाहवे. नंतर कोहळा हातामध्ये घेऊन त्याला प्रार्थना करावी कि आमच्या घरातील असणारी नकारात्मकता दूर करण्यास आम्हास सहाय्य कर त्यानंतर हा कोवळा जमिनीवर न ठेवता घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर किंवा आतल्या बाजूला आपण लावून शकता . हा कोहळा आपण लाल वस्त्र मध्ये बांधू  शकता किंवा शिख्यामध्ये अडकवू शकता. लाल वस्त्रात जर आपण कोहळा बांधला तर खराब झालेलं आपल्या लक्षात येत नाही.  म्हणून शक्य झाल्यास कोळा हा शिख्यामध्ये अडकवून ठेवावा. 

बांधल्यानंतर दिवसातून एकदा त्याला अगरबत्ती ही दाखवावी तसेच आपली दृष्टी दिवसातून एकदा त्यावर गेली पाहिजे.  अशा प्रकारे तो टांगण्याचं प्रयत्न करा. शक्य झाल्यास कोवळा हा शनिवारी सूर्यास्त नंतर मुख्य दरवाजावरती लावायचा आहे किंवा पौर्णिमा व अमावस्या यामध्येही आपण कोहळा लावू शकता .  टांगल्या नंतर कोहळा हा खराब झाल्यास त्यावरती पाणी शिंपडून तो नदीमध्ये प्रवाहित करू शकता किंवा डस्टबिन मध्ये टाकू शकता. अशाप्रकारे आपण आपल्या घराचे  नकारात्मक ऊर्जेपासून रक्षण करू शकता . धन्यवाद

Scroll to Top