घरातील देवघराची चुकीची जागा कोणती? जाणून घ्या वास्तु नियम

  घरातील देवघर हे उत्तर पूर्व अर्थातच ईशान्य दिशेतील कोणामध्ये बनवलं पाहिजे. कारण की उत्तर पूर्व मध्ये परमेश्वराचा अर्थास ईश्वराचा वास असतो. सांगण्यात येते की देवी लक्ष्मी व भगवान विष्णू उत्तर पूर्व दिशेमध्ये निवास करतात त्याचबरोबर ईशान्य दिशेमध्ये गुरु ग्रहाचे वास्तव्य असल्याने तो अध्यात्मिक प्रगतीसाठी ही दिशा लाभदायक ठरते. देवघरासाठी ईशान्य दिशेतील जागा ही मिळत नसल्यास देवघरे उत्तर, पूर्व किंवा पश्चिम दिशेला आपण बनवू शकतो. या दिशा पूजा घरासाठी अत्यंत उपयुक्त असतात. घरामध्ये काही मुख्य पूजा कथा किंवा होम हवन करायची झाल्यास घराच्या मध्यभागी ब्रह्मस्थान किंवा घराच्या अंगणात आपण त्या आयोजित करू शकतो.            

देवघराची व्यवस्था: बेडरूममध्ये योग्य की अयोग्य?

 बेडरूम हा शुक्र ग्रहाच्या अधिपत्याखाली येतो जो भौतिकवादी ग्रह म्हणून ओळखला जातो.  याउलट देवघर हे गुरु ग्रहाच्या अधिपत्याखाली येते हा ग्रह सात्विक ग्रह आहे.  तो सात्विक गुणांची वाढ करतो अशावेळी जर बेडरूम मध्ये पूजा घर ठेवल्यास बेडरूमचा स्वामी ग्रह शुक्र हा गुरु ग्रहाचा प्रभाव कमी करतो परिणाम स्वरूप घरातील अध्यात्मिकता कमी होऊन देवघरातून मिळणारा लाभ हा पाहिजे तसा मिळत नाही.                                           

घरामधील देवघराची व्यवस्था

सकारात्मक उर्जेसाठी देवघर किचनमध्ये ठेवणे का टाळावे?

 बरेचसे लोक देवघरे किचनमध्ये बनवतात ते योग्य नाही.  किचनमध्ये उपयोगात येणाऱ्या वस्तू अर्थातच मसाले ,गॅस, तेल , चमचा, मीठ हे सर्व मंगळ ग्रहाचे प्रतीक म्हणून ओळखल्या जातात. मंगळ ग्रहाचा प्रभाव किचनमध्ये मोठ्या प्रमाणावर असतो.  मंगळ हा ग्रह तापदाय असल्याने देवघरातील शांती आणि सात्विकता ही कमी करतो त्यामुळे अध्यात्मिक विकास हा होत नाही. म्हणूनच देवघर किचनमध्ये मध्ये ठेवण्याचे टाळावे.                                    

सकारात्मक उर्जेसाठी देवघर या ठिकाणी कधीही ठेवू नका

 देवघर हे किचन आणि बेडरूम मध्ये करण्याचे टाळावे. टॉयलेटच्या समोर देवघर असू नये कारण की टॉयलेट वर राहू या ग्रहाचा प्रभाव मोठ्या प्रमाणावर असतो. त्याचप्रमाणे राहू हा राक्षसी प्रवृत्तीचा असल्याने सात्विक गुण मोठ्या प्रमाणावर कमी करतो म्हणूनच टॉयलेटच्या समोर किंवा टॉयलेटच्या भिंतीला लागून देवघर  करू नये. त्याचप्रमाणे जिन्याखाली सुद्धा देवघर कधी बनवू नये.             

सुख-समृद्धीसाठी देवघरात या गोष्टींचा नक्की विचार करा

 देवघरामध्ये मूर्ती, प्रतिमा, फोटो हे नेहमी नीटनेटके असावेत. मूर्ती या नेहमी धातू, दगड किंवा मातीच्या ठेवाव्यात. मातीच्या मूर्ती या शुभ असतात परंतु त्या आतून पोकळ नसाव्यात.  याउलट प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी) च्या मूर्ती या पोकळ असल्याने अशा मूर्ती देव घरामध्ये ठेवू नये.  सामान्यता देवघरात ठेवणाऱ्या मुर्त्या या बैठ्या स्वरूपातील असाव्यात. घरातील मुर्त्यांची उंची नऊ इंचापेक्षा जास्त ठेवू नये. देवघर ठेवण्याच्या मागे पक्की भिंतही असावी. प्राचीन मंदिरातील मूर्ती किंवा प्रतिमा ही देवघरात ठेवू नये. खंडित झालेली मूर्ती जर ती बहुमूल्य असली तरीही देवघरात ठेवू नये. विधी विधानानुसार पवित्र ठिकाणी विसर्जित करून टाकावी. देवी देवतांची स्थापना करणारी दिशा ही पूर्व पश्चिम असावी. देवी देवतांच्या मुर्त्या या उत्तर दिशेच्या भिंतीला लागून असू नये त्यामुळे देवतांचे मुख दक्षिण  दिशेला होत. लक्ष्मीची पूजा ही नेहमी पूर्व पश्चिम तोंड करून केली जाते.  देवघरातील मूर्तीचे तोंड एकमेकांसमोर करून असू नये. घरामधील देवी देवतांची प्राणप्रतिष्ठा करू नये.  प्राणप्रतिष्ठा केल्यास शास्त्रानुसार पूजा प्रसाद संध्या या गोष्टी नियमित करणे आवश्यक असतात.  कागद ॲल्युमिनियम काच यांच्यापासून बनवलेल्या मुर्त्या घरात कधी ठेवू नये त्यातून फक्त दर्शन लाभ होतो, परंतु इच्छित फलप्राप्ती होत नाही. दोन शिवलिंग, दोन शालीग्राम, दोन शंख, तीन देवी प्रतिमा आणि तीन गणेश मूर्ती देवघरात एकत्र कधी ठेवू नये. आयताकृती देवघर हे अत्यंत शुभदायी असते. पूजा घरात सफेद संगमरवर दगड हा उत्तम समजला जातो.  त्याचप्रमाणे पूजा घराचा रंग हा सफेद, हलका पिवळा किंवा हलका निळा असला पाहिजे.    

ज्याप्रमाणे मनुष्याच्या आजूबाजूला असणाऱ्या घाणीचा प्रभाव हा त्याच्या आरोग्यावर पडतो त्याप्रमाणे देवघरांमध्ये साफसफाई न केल्यास अध्यात्मिक ऊर्जेचा श्रेय होतो व उपासनेचा लाभ मिळत नाही.

वास्तुशाश्त्रानुसार आपल्या घराचे परीक्षण करून घेण्यासाठी किंवा नवीन घराचा प्लॅन काढून घेण्यासाठी, आपण आम्हाला खाली दिलेल्या नंबर वर संपर्क साधू शकता.

 धन्यवाद , 

 श्री. मनोज श्रीमंत ताजणे                                                       91366 38039

Scroll to Top