वास्तुसुख लाभण्यासाठी मनुष्याला वास्तुशाश्त्र समजून घेणे हे महत्वाचे आहै. प्रत्येक व्यक्तीच्या तीन गरजा या अत्यावश्यक मानल्या जातात.
अन्न, वस्त्र व निवारा, यापैकी निवारा म्हणजे ‘निवास’ . जेव्हा एखादे घर आपण विकत घेतो परंतु वास्तुशाश्त्राचा विचार केला जात नाही अशावेळी त्या घरामध्ये वास्तू दोष निर्माण होण्याची शक्यता निर्माण होते. आपण या लेखात वास्तुदोषांचे परिणाम व लक्षणे यांचा विचार करणार आहोत.
जेव्हा घरामध्ये वास्तुशाश्त्राचा विचार होत नाही अशावेळी घरातील पंचतत्वांचा समतोल हा बिघडला जातो. त्याचा परिणाम घरातील वातावरणावर होऊन घरामध्ये वास्तुदोष हा निर्माण होतो.
वास्तुदोषांचे परिणाम गंभीरही होऊ शकतात. वास्तुदोषयुक्त घरात राहिल्याने नित्य आजारपण चालू असतात.घरामध्ये वातावरणामध्ये नकारात्मकता हि मोठ्या प्रमाणावर पसरलेली असते. घरात आपसामध्ये वादविवाद, वितंडवाद सुरू असतात. मुलांचा उन्नतीत अडथळे निर्माण होतात. संततीप्राप्ती तसेच संततीच्या भाग्योदयात अडचणी येतात. अनपेक्षित आर्थिक तोटे सहन करावे लागतात. वारंवार नियोजनात अपयश येते. आध्यात्मिक धार्मिक साधनेताही नगण्य फलप्राप्ती होते. घरात कुणालाच मानसिक स्वास्थ्य लाभत नाही. हे दोष नेमकेपणाने जाणण्यासाठी आठ दिशा , घराचे मुख्य प्रवेशद्वार, वास्तूतील रंगसंगती , ब्रह्मस्थान, बाहेरचा परिसर यांचा विचार करावा लागतो.

वास्तुदोषांची लक्षणे
वास्तुमध्ये अशुभ शक्तीचा वास अथवा वास्तुदोष आहे की नाही हे घरात राहणाऱ्या व्यक्तीन पेक्षा बाहेरील व्यक्तींना याची जाणीव होऊ शकते. वास्तुदोष जाणून घेण्याची पुढील लक्षणे
१. बाहेरील व्यक्ती वास्तुमध्ये प्रवेश करताना घाम येणे. श्वासोच्छवासाचा वेग वाढणे. नाडी जोरात चालणे. त्या वास्तुमधून बाहेर पडताच ही लक्षणे बंद होतात.
२. वास्तुमध्ये ओलसरपणा, दमटपणा, कुबटपणाचा वास येणे.
३. घरात चालताना काही ठिकाणीच फरशी थंड भासते.
४. काही वेळा घरात पाऊल ठेवताच अंग शहारते.
५. घरात प्रवेश करताच थोड्या वेळातच श्वासाची नाडी बदलते. जसे की उजवी चालू असल्यास ती नाकपुडी बंद होऊन डाव्या नाकपुडीने श्वास सुरू होतो.
६. बाहेरच्या व्यक्तीस त्या घरातील अन्नाला चव लागत नाही.
७. काही वेळा मधमाशा घरात पोळे करतात. घरात् लाल मुंग्यांचा वावर जास्त असतो.
वास्तुशाश्त्र विषयी माहिती घेण्यासाठी आपण आमचा यूट्यूब चॅनेल ला भेट देऊ शकता . धन्यवाद