
घरामध्ये वास्तुशांती का केली पाहिजे ?
वास्तुशांतीला वास्तुशमन विधी म्हणूनही ओळखला जातो .
आपण नवीन वास्तू विकत घेतो किंवा आपली नवीन वास्तू बांधतो. वास्तू बांधून झाल्यावर त्या घरात प्रवेश करण्यापूर्वी वास्तुशांती हा विधी केला जातो.आपण ज्या जागेवर आपली वास्तू उभारतो , त्या जागेवर कित्येक वर्षापासून पशु -पक्षी , कृमी , झाडे यांचे, वास्तव्य असते.
अशावेळी आपण जेव्हा आपली वास्तू उभारतो तेव्हा नकळत जीव जंतू , झाडे झुडपं नष्ट केली जातात . आणि त्या जागेचा दोष हा त्या ठिकाणी राहणाऱ्या व्यक्तींना सहन करावा लागतो . अशावेळी नकळत जे जीव जंतू नष्ट झाले अशा गेलेल्या आत्म्याना शांती लाभून त्याचा पुढचा प्रवास सुखकर व्हावा , म्हणून जो शाश्त्रात विधी सांगितला गेला आहै त्या विधीला वास्तुशांती म्हणून ओळखला जातो .
वास्तुशांती मध्ये वास्तुपुरुष प्रतिमेचे प्राणप्रतिष्ठापना पूर्वक पुजन करण्यात येत. मुळातच वास्तुशांतीची सुरूवात गणेशपुजना पासून होते . यानंतर पुण्याहवाचन , मातृकापुजन , नांदीश्राद्ध , मुख्य वास्तुपीठ स्थापना , वास्तुप्रतिमेचे प्राणप्रतिष्ठापना पूर्वक पुजन , नवग्रह स्थापना व पुजन , व शेवटी ईशान्य रूद्र पुजन करून हवन केले जाते. यानंतर धरा पुजन करून वास्तुप्रतिमेचे निक्षेपण केले जाते . ह्या विधीला इतर पूजेचा मानाने जास्त वेळ लागतो . शक्यतो हा विधीला आपल्या घरातील व्यक्तीसोबत करावा कारण हा विधी जवळ जवळ आठ – दहा तास चालतो अशावेळी जर बाहेरील व्यक्तींना जेव्हा आपण आमंत्रण देतो त्यांचा पाहुणचार करण्यात आपले लक्ष हे विचलित होत. वास्तुशांती पूजेवर लक्ष केंद्रित होत नाही . म्हणूनच शक्य झाल्यास आपण आपल्याला घरातील व्यक्ती सोबत करावा हा विधी पूर्ण करावा.
वास्तुशांतीच्या दिवशी सत्यनारायण पूजा घालणे योग्य कि अयोग्य ?
वास्तू शांती हा विधी घरातील वास्तुपुरुषाला शांत करण्यासाठी केला जातो . अशावेळी जर आपण सत्यनारायण पूजा केल्यास वास्तुशांतीचे शुभ फळ त्या घरातील व्यक्तींना प्राप्त होत नाही . कारण वास्तूपुरुष व भगवान विष्णूची ह्या दोन्ही भिन्न देवता आहै . ह्या दोघांची पूजा हि एकाच वेळी केली जात नाही. वास्तुशांती दिवशी वास्तुपुरुषाचा मान हा दिला जातो. म्हणून वास्तुशांतीचा दिवशी सत्यनारायण पूजा हि एकत्र घालू नये . वास्तुशांती चे ठराविक असे मुहूर्त हे असतात तर सत्यनारायण आपण कधी घालू शकतो. अशावेळी आपण वास्तुशांतीचा दुसऱ्या दिवशी सत्यनारायण पूजा घालून बाहेरील व्यक्तींना आमंत्रण देऊ शकता.

वास्तू शांती झाल्यानंतर वास्तू पुरुषाचा निक्षेप करतांना कोणती काळजी घेणे महत्वाचे ठरते ?
वास्तुशांती वेळी वास्तुपुरुष प्रतिमा , पंचरत्न , शलाका (काठी ), सूर्यप्रतिमा , पंचधातूची वडी , ह्या वस्तू आपल्या वास्तूमध्ये निक्षेप करण्यासाठी आपल्याला दिल्या जातात . वास्तुपुरुषाचा निक्षेप हा आपल्या वास्तू मध्ये योग्य दिशेला आणि जमिनीचा खाली करणे हे महत्वाचे आहै तरच वास्तू शांती पूजचे फळ हे आपल्याला प्राप्त होते . बऱ्याचदा वास्तू परीक्षण करतांना काही गोष्टी ह्या लक्षात आल्या त्या म्हणजे वास्तुपुरुष चुकीचा दिशेला निक्षेप झालेला , दुसरी गोष्ट वास्तू पुरुष जमिनीच्या आत मध्ये न पुरता फॉल सिलिन्ग मध्ये किंवा भिंती मध्ये पुरलेला आढळला . अशा चुकीचा ठिकाणी वास्तुपुरुष निक्षेप केल्याने त्या व्यक्तीला एवढा मोठा विधी करून एवढे पैसे खर्च करून वास्तुशांतीचे शुभ फळ प्राप्त होत नाही. या मध्ये असं लक्षात कि , एकतर लोकांना जमिनी मध्ये खडा करायचा नसतो .किंवा त्यांना चुकीची माहिती दिली जाते . ज्या प्रमाणे आपल्या पत्रिकेतील आपली जन्म दिनांक , जन्म वेळ , किंवा जन्म ठिकाण चुकले कि पत्रिकेचे अवलोकन हे चुकले जाते . त्याप्रमाणे वास्तूमध्ये दिशा चुकली कि त्याचे फळ हे चुकले जाते तसेच वास्तू मध्ये योग्य दिशेला वास्तुपुरुष निक्षेप करणे हे महत्वाचे ठरते. आमचा कडे अनेक व्यक्ती ह्या आपल्या घरातील वास्तुपुरुष निक्षेप करण्याची योग्य दिशा हि कोणती या बदल विचारणा करतात . त्यावर आम्ही त्यांचा घराचा आरखडा काढून त्यावर त्यांना मार्गदर्शन करतो .

वास्तू पुरुषाचा निक्षेप आपण कोणत्या दिशेला करावा ?
वास्तुपुरुषाचा निक्षेप हा आपल्या वस्तूचा आग्नेय दिशे मध्ये करावा. त्यासाठी आपल्या घराची उत्तर दिशा हि शोधून, त्यानुसार आपल्या घराचा आग्नेय प्रभाग कोणत्या बाजूला येतो आहै . हे पाहून त्या प्रभागात छोटा खडा करून वास्तुपुरुषाची प्रतिमा पालथी करून अर्थात वास्तू पुरुषाचे पोट हे जमिनीला लागेल व वास्तू पुरुषाचे डोकं हे ईशान्य दिशेला ठेवून पाय हे नैऋत्य ला राहतील अशा प्रकारे वस्तू पुरुषाचा प्रतिमेचा घरात निक्षेप हा केला जातो . निक्षेप करताना प्रतिमेबरोबर पंचरत्न , शलाका (काठी ), ह्या गोष्टीचा निक्षेप करावा . ह्या बद्दलचा प्रॅक्टिकल विडिओ ची लिंक आपण खाली दिलेली आहै . आपण जरूर पहा त्यामुळे आपल्या सर्व शंकाच निरसन होऊन आपण वास्तुपुरुष प्रतिमा योग्य दिशेला निक्षेप करू शकता. त्याचबरोबर सोबत मिळालेली पंचधातूची वडी हि आपण उंबरठ्याच्या आत मध्ये पुरु शकता व सूर्य प्रतिमा देवघरात पूजे साठी ठेऊ शकता .
वास्तू पुरुषाचा निक्षेप केलेल्या जागेवर आपण कोणते नियम पाळले पाहिजे ?
ज्या ठिकाणी वास्तुपुरुष निक्षेप केला गेला आहै ती जागा स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करा . शक्य असल्यास त्याजागेवर संध्याकाळी दिवा लावणे, त्याचप्रमाणे त्याजागेवर कोण्याही प्रकारचे जडत्व येता काम नये याची दक्षता घ्या . सणासुदीला वास्तुपुरुषाला नैवेद्य दाखवायला विसरू नका तसेच पौर्णिमा , अमावस्या ह्या दिवशी वास्तुपुरुषाला दही-भाताचा नेवैद्य दाखवा. त्यामुळे आपल्या घरादाराची प्रगती होण्यास मदत होते . तसेच वास्तू मध्ये नेहमी सकारात्मक बोला कारण वास्तुपुरुष हा नेहमी तथास्तु बोलत असतो . आपल्या हा लेख कसा वाटलं हे जरूर आपण कंमेंट्स बॉक्स मध्ये लिहू शकता .
आपल्या कंमेंट्स मुळे मला नवीन नवीन विषयावर लिहिण्याची प्रेरणा मिळते . आपल्या काही शंका असेल तर जरूर आम्हाला कंमेंट्स बॉक्स मध्ये लिहू शकता . धन्यवाद