वास्तूशांती का करावी? – कारण जाणून घ्या!

वास्तूशांती का करावी? – नवीन घराच्या शुभ सुरुवातीसाठी महत्वाचा विधी.

घरात सुख, शांती आणि सकारात्मकता यासाठी अत्यंत महत्वाची पूजा! नवं घर घेताना आपण त्याची लोकेशन, प्लॅन, किंमत — सगळं पाहतो. पण त्या जागेचा पूर्व इतिहास, तिथे घडलेल्या घटना, ऊर्जा आणि वातावरण याबाबत आपण अनभिज्ञच राहतो. म्हणूनच वास्तूशांती करणे अनिवार्य मानले जाते.

जमिनीचा पूर्व इतिहास

आपण जमीन किंवा तयार घर खरेदी करतो, पण त्यावर पूर्वी काय घडलं? कोण राहिलं? कोणते प्रसंग घडले? ही माहिती बहुतेक वेळा कुणालाच ठाऊक नसते.

भूमीवर आधीच असतात अनेक जीवजंतू

जमिनीत असंख्य किडे, लहान-मोठ्या वनस्पती त्यांच्या अंडी-पिल्लांपासून सुरू झालेला संसार वास्तू बांधताना नकळत त्यांचा बळी जातो. यामुळे निर्माण झालेली असंतुलित ऊर्जा वास्तूत टिकून राहू शकते.

कामगारांचा त्रास, दुखापती आणि तळमळ

बांधकामादरम्यान, काही कामगारांना दुखापती होतात काहींवर अन्याय होतो. काहींना योग्य मोबदला मिळत नाही. त्यांची तळमळ आणि अशांत ऊर्जा वास्तूभोवती राहू शकते.

अभक्ष-अपेयी सवयींचा नकारात्मक प्रभाव

 महिनोनमहिने काम करणारे कामगार बऱ्याचदा अभक्ष / अपेय सेवन करून काम करतात. त्यांची वाईट भाषा, विचारांची नकारात्मकता वास्तूत स्थिरावते. जिथे अशा सवयी असतात, तिथे वाईट प्रवृत्ती, अतृप्त आत्मे आणि नकारात्मक शक्ती येण्याची शक्यता जास्त असते.

अशा वास्तूत राहिल्यास त्रास संभवतो

 योग्य वास्तूशांती न करता अशा घरात राहिल्यास आरोग्य बिघडणे, वाद-विवाद वाढणे, आर्थिक अडचणी, अनैसर्गिक तणाव असे परिणाम अनुभवल्याचे अनेक उदाहरणांमध्ये दिसते.

म्हणूनच वास्तूशांती आवश्यक

वास्तूशांती केल्याने नकारात्मक शक्तींचा नाश , जमिनीवरील सर्व दोषांचे शुद्धीकरण, घरात सकारात्मक ऊर्जा, शांती आणि समृद्धी, घरकुलाच्या सुखी आयुष्याची सुरुवात हे सुनिश्चित होते.

Scroll to Top