जेव्हा जातकाच्या चंद्र राशीच्या बाराव्या स्थानात शनि महाराज प्रवेश करतात तेव्हा त्या राशीला किंवा जातकाला साडेसाती चालू झाली आहे असे म्हणतात. शनि महाराज प्रथमता बाराव्या स्थानात अडीच वर्ष नंतर प्रथम स्थानात चंद्राबरोबर अडीच वर्ष नंतर द्वितीय भावात अडीच वर्ष असतात. याला साडेसाती असे म्हणतात.
शनीच्या साडेसातीचे अडीज -अडीज वर्षाचे एकूण तीन काल असतात . पाहिले अडीज वर्ष व शेवटची अडीज वर्ष हि थोडी त्रासदाय स्वरूपाची समजली जातात. मधली अडीज वर्ष हि मध्यम स्वरूपाची समजली जातात .
ज्योतिष शास्त्रात शनीला कर्माचे फळ देणारा ग्रह म्हटले आहे. शनिदेव माणसाला त्याच्या कर्माच्या आधारे फळ देतो.या काळात व्यक्तीचा स्वभावा मध्ये आमूलाग्र असा बदल दिसून येतो . चिडचिड स्वभाव हा शांत होतो व आपल्यातील अहंकार कमी करण्यास मदत करतो.
शनीच्या साडेसातीचा प्रत्येक टप्प्याचा वेगळा प्रभाव असतो. हा काळ खूपच आव्हानात्मक आहे, परंतु शनि साडेसातीच्या उपायांनी आराम मिळू शकतो.
शनीची साडेसाती टाळण्याचे अचूक उपाय

काळे उडीद, मोहरीचे तेल, काळे तीळ, कुळीथ, लोखंडी वस्तू, काळे कपडे या शनीला आवडणाऱ्या वस्तू गरीबाना वाटाव्यात.
पिंपळाच्या झाडाशी दूध आणि पाणी मिसळून दर शनिवारी नियमितपणे अर्पण करावे.
काळ्या उडीद डाळीच्या पिठाचे गोळे करून माशांना खाऊ घालावे.
शनि चालीसा वा हनुमान चालीसा पठण करावे.
शनिवारी चामड्यांची वस्तू खरेदी करू नये.
वडाच्या किंवा पिंपळाच्या झाडाला पाणी घालावे. तेथील माती कपाळावर लावावी.
घरात गोमूत्र किंवा गंगाजल झिंपडावे.
जमिनीत काळा सुरमा किंवा शेंदूर पुरावा.
शनी ग्रहाचे यंत्र घराचे मुख्य दरवाजावर लावावे.
दहा, अकरा किंवा तेरा मुखे असलेल्या रुद्राक्षाची घरात स्थापना करावी.
आपली इष्टदेवता किंवा पिंपळाचे झाड येथे तेलाचा दिवा लावावा.
शनी बीज मंत्राचा जप दररोज करावा. विशेषतः शनिवारी अवश्य करावा.
माकडांना केळी खाऊ घालावी.
आपल्या पेक्षा चांगल्या गोष्टी इतरांना मिळतात. त्या आपल्याला पाहिजेतच अशी इच्छा करू नये.
हनुमंताचे मारुतीस्तोत्र , हनुमान चालीसा, बजरंगबाण किंवा सुंदरकांड ही हनुमंताच्या पराक्रमाचे गुणवर्णन करणारी स्तोत्रे म्हणावीत.
घरामध्ये नेहमीत अग्नीहोत्र करणे.
जर दुसऱ्याचे पैसे घेतले असतील तर ते लवकरात लवकर परत करावेत.त्यामुळे साडेसाती दोष कमी होण्यास मदत होते.
शनिवारी स्मशानात लाकडी दान करावीत त्यामुळे मृत्यूचे भय वाटत नाही.
वरील दिलेल्या उपायानं पैकी आपल्याला शक्य असणारा उपाय जरूर करून आपल्या जीवनातील साडेसातीचा प्रभाव हा नक्की कमी करू शकता . धन्यवाद