सदनिका आणि इमारतीसाठी वास्तुशास्त्र – एक उपयुक्त मार्गदर्शक

 वास्तुशास्त्र हे सुमारे ५,००० वर्षांपूर्वीचे प्राचीन भारतीय शाश्त्र आहे. आपल्या ऋषी मुनींनी मानवाचा कल्याणासाठी लिहलं गेले हे शाश्त्र आहै.

दुर्दैवाने जेव्हा भारतामध्ये चिनी फेंगशुईचा वापर हा मोठ्या प्रमाणावर वाढला गेला त्यानंतर भारतीय लोंकाचा वास्तुशाश्त्राकडे विशेष कल वाढला गेला . 

आजच्या घडीला जेव्हा मोठमोठे उद्योगपती, राजकारणी व कलाकार आपल्या कार्यालयांची ठिकाणी व आपल्या घरी वास्तुशास्त्रानुसार रचना करताना  दिसतात, कारण एकच  आयुष्यामध्ये  आर्थिक आणि मानसिक स्थैर्य त्यांना हवे असते. यातून सर्वसामान्य व्यक्ती हा या शाश्त्राशी जोडला गेला.

मोठ्या शहरांमध्ये घर घेताना वास्तुशाश्त्राचा विचार करणे का आवश्यक आहै ?

मोठ्या शहरांमध्ये मर्यादित जागेमध्ये मोठ्या प्राणावर लोकसंख्या हि राहते . जागेच्या अभावी भूखंड हे आपल्याला योग्य आकारामध्ये उपलब्ध होत नाही . जागा विकत घेण्यासाठी बिल्डर लॉबी मध्ये वाढणारी चढाओढ, त्यामुळे भूखंडाचे  भाव हे मोठ्या प्रमाणावर वाढतात. अशा वेड्यावाकड्या आकाराचा जागे अनुसार इमारतीची रचना हि केली जाते व जास्तीच जास्त सदनिका त्या आकाराचा जागे मध्ये बसवल्या जातात. यामध्ये वास्तुशाश्त्राचा विचार हा पूर्ण पणे दुर्लक्ष केला जातो. अर्थातच ५० ते ६० टक्के वास्तुदोष हा त्या जागे मध्ये निर्माण झालेला असतो . 

जेव्हा सर्व साधारण व्यक्ती होम लोन काढून  अशा सदनिका ह्या विकत घेतात.  अशावेळी वास्तुशाश्त्राची मदत घेऊन काही हजार रुपये खर्च करून उपाययोजनांचा माध्यमातून त्या घरातील दोषाचे प्रमाण हे नकीच कमी करू शकता , ते पण आयुष्यभरासाठी. म्हणूनच वास्तुशाश्त्रासाठी केलेला खर्च हि एक गुंतवणूक आहै. जी घराच्या किमतीच्या मानाने नगण्य आहे, पण परिणामकारकतेच्या अनुषंगाने अत्यंत मौल्यवान ठरते.  त्यामुळे घर खरेदी करताना वास्तुशास्त्राचा विचार होणे हे अत्यंत आवश्यक आहे. 

जेव्हा आपण वास्तुशास्त्रानुसार सदनिका घेतो त्यावेळी वास्तू मधील असणारे पंचतत्वांचा हा समतोल साधला जातो.  या कारणाने वास्तूचा होरा हा सकारात्मक होण्यास मदत होते.  त्यामुळे घरातील वातावरण हे उत्साही, आनंदी व पवित्र होण्यास मदत होते.  अशा वातावरणामध्ये जेव्हा घरातील सर्व लोक हे राहतात. तेव्हा त्यांना त्यांच्या कामामध्ये काम करण्यास एक प्रकारचा उत्साह जाणवतो.  त्यातून ते जास्तीत जास्त काम करण्यास प्रवृत्त होतात व त्यातून मोट्या प्रमाणावर आर्थिक लाभही हा प्राप्त करून घेतात. 
 
जेव्हा वास्तुशास्त्राचा सदनिका घेताना विचार होत नाही. अशावेळी घरामध्ये एक नकारात्मकता पसरते व त्यामुळे घरातील वातावरण दूषित होण्यास मदत होते. त्यातून घरातील व्यक्तींना विविध समस्यांना मग त्या आर्थिक, सामाजिक किंवा आरोग्य संबंधी तक्रारी  यांना तोंड द्यावे लागते.  हे टाळण्यासाठी , आपण जेव्हा नवीन सदनिका घेत असताना प्रथम वास्तुशास्त्राचा विचार करणे अत्यंत आवश्यक आहे.  त्यामुळे पुढील होणाऱ्या संभाव्य संकटांपासून आपण स्वतःला वाचू शकतो. 
म्हणूनच बहुमजली इमारत बांधताना जमिनीच्या आकाराचा विचार करून व वास्तुशास्त्राची सांगड घालून जर एखादी इमारत ही बनवली तर त्यातून होणारे फायदे हे त्या इमारतीमध्ये  राहणाऱ्या सर्व सदनिका धारकांना होऊन.  रहिवाशांमध्ये शांतता व एकोपा राहण्यास नक्कीच मदत ही मिळू शकते तसेच बांधकामही योग्य कालावधीमध्ये पूर्ण होते. 

वास्तुशास्त्र हे तीन स्तरामध्ये विभागले आहै

 १) सार्वजनिक जागांचे नियोजन (टाउन प्लांनिंग ): शहराची रचना , उद्याने, रस्त्यांची मांडणी , पूल, नद्या, विहिरी यांची जागा आणि दिशा ठरवते.

२)घर/इमारतीची रचना: वास्तुशास्त्र हे घर, दुकान, ऑफिस यांचे दरवाजे, खोल्या इत्यादी योग्य दिशेनुसार मांडणी करून  व पंचतत्वावर समतोल साधणे.

३)दैनंदिन वापरायचा वस्तूची जागा : फर्निचर, कॉम्पुटर , बेड , स्टडी टेबल , पूजाघर , किचन मधील मांडणी , यांची जागा सुद्धा वास्तुशास्त्रात दिली आहे.

जमीन व प्लॉट मध्ये बांधकाम करतानाचे नियम :

  • जमिनीची निवड काळजीपूर्वक करावी. 
  • उत्तर व पूर्व बाजूस मोकळी जागा अधिक असावी.
  • प्लॉट चौकोनी किंवा आयताकृती असावा. दक्षिण-पश्चिम कोपरा ९० अंश असावा.
  • पूर्व, उत्तर, ईशान्य दिशेला रस्ते असावेत. २ गेट्स ठेवावेत – एक पूर्वेला, एक उत्तरेला.
  • भूखंडाचा उतार ईशान्येकडे असावा. दक्षिण-पश्चिम बाजू उंच असावी.
  • बांधकामपूर्वी ईशान्येत विहीर किंवा बोअरवेल करावी.
  • ईशान्येला भूखंड थोडा वाढलेला असेल तर शुभ मानले जाते.

फ्लॅटची रचना करताना पाळावयाचे नियम :

  • स्वयंपाकघर दक्षिण-पूर्व किंवा उत्तर-पश्चिम दिशेला असावे.
  • बाल्कनी पूर्व, उत्तर किंवा ईशान्य दिशेस असावी. दक्षिण व पश्चिम दिशेला टाळावी.
  • टेरेसवरचे किचनही दक्षिण-पूर्व किंवा उत्तर-पश्चिमेत ठेवावे.
  • पायऱ्या दक्षिण, पश्चिम किंवा दक्षिण-पश्चिमेत असाव्यात. ईशान्येत पायऱ्या नसाव्यात.
  • फ्लॅटचा मुख्य दरवाजा पूर्व, उत्तर, ईशान्य, पश्चिम किंवा उत्तर-पश्चिम दिशेला असावा.
  • विहिरी किंवा बोअरवेल दक्षिण-पूर्व, उत्तर-पश्चिम किंवा दक्षिण-पश्चिम दिशेला नसाव्यात.

तळघर व पार्किंग:

  • तळघर उत्तर किंवा पूर्व बाजूस असावे. दक्षिण किंवा पश्चिम बाजूस टाळावे.
  • ईशान्य दिशेचा तळघर हलक्या वाहनांच्या पार्किंगसाठी वापरावा.
  • ईशान्य भागात लॉन, बोअरवेल व पंप असावेत.

नैसर्गिक रचना:

  • तलाव, नद्या, विहिरी उत्तर किंवा पूर्वेला असाव्यात.
  • पश्चिम किंवा दक्षिण दिशेला डोंगर किंवा मोठी इमारत असावी.
  • उत्तर किंवा पूर्वेला मोठे झाड नसावे.
  • दक्षिण किंवा पश्चिमेला खड्डे किंवा विहिरी नसाव्यात.
  • सर्व कोपरे ९० अंशाचे असावेत. फक्त ईशान्य कोपरा थोडा वाढलेला असेल तर चालतो.
  • पावसाचे पाणी दक्षिणेकडून उत्तरेकडे आणि पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहावे.
  • दक्षिण-पश्चिम दिशा  सर्वात उंच आणि ईशान्य सर्वात खाली असावा.
  • कोपरे चुकीचे असतील तर बांधकाम सुरू करण्यापूर्वी दुरुस्त करावेत.
  • रस्ता जिथे संपतो तिथे भूखंड असेल तर काळजी घ्यावी. काही शुभ, काही अशुभ असतात – याला वीथी शूळ म्हणतात.
  • अपार्टमेंटला काळा, आकाशी निळा किंवा लाल रंग लावू नये.

जर तुम्ही फ्लॅट किंवा अपार्टमेंट बांधत असाल किंवा घेणार असाल, तर या महत्त्वाच्या वास्तु नियमांचा विचार नक्कीच करा. यामुळे तुमचं आयुष्य शांत, समृद्ध आणि आनंदी होईल.

वास्तुशाश्त्र विषयी माहिती घेण्यासाठी आपण आमचा युट्युब  चॅनेल ला भेट देऊ शकता.

वास्तुशाश्त्रानुसार आपल्या घराचे परीक्षण करून घेण्यासाठी किंवा नवीन घराचा प्लॅन काढून घेण्यासाठी, आपण आम्हाला खाली दिलेल्या नंबर वर संपर्क साधू शकता.                                                                  धन्यवाद ,                                                                       श्री. मनोज श्रीमंत ताजणे                                                            91366 38039

Scroll to Top