वास्तुशाश्त्रानुसार उंबरठ्याचे महत्त्व

उंबरठ्याचे महत्त्व व त्याची पूजा

उंबरठा हा बाहेर व आत या दोन भागांना जोडणारा तो दुवा आहे. उंबरठा सुसंस्कृतीची मर्यादा दाखवतो. सीमा रेषा दाखवतो. संयम जागृत ठेवतो. उंबरठ्याची जाणीव कायम रहावीव त्याची जपणूक व्हावी, म्हणून त्याचे स्मरण व पूजन केले जाते. मनुष्य बाहेरील वातावरणातून घराच्या आत मध्ये प्रवेश करतो त्यावेळी उंबरठा हा त्याला संयम रेषेची जाणीव करून देतो. आपल्याबरोबर बाहेरून घेऊन आलेले सर्व विकल्प सोडून मोठ्या आनंदाने व उत्साहाने घरात प्रवेश करतो त्यामुळे घरातील वातावरण आनंदमय होऊन . पवित्र मय ऊर्जा चा वास घरात निर्माण होतो

उंबरठ्याची पूजा कोणी करावी ?

उंबरठ्याला मर्यादा पुरुषोत्तम असेही म्हणतात याच्या नावांमध्येच मर्यादा म्हणजेच स्त्री तत्व व पुरुषोत्तम म्हणजे पुरुष तत्त्व हे दोन्ही वास करतात म्हणून उंबरठ्याची पूजा ही स्त्री व पुरुष हे दोन्हीही करू शकतात.

घराला उंबरठा का असावा ?

घराला उंबरठा हा जरूर असावा . त्यामुळे घरा बाहेरून येणारी नकारात्मक शक्तीला अटकाव निर्माण होतो . उबरठ्यामुळे घराचा मुख्य दरवाजाची चौकट पूर्ण होते . जर घराला उंबरठा नसेल तर दरवाजाची त्रिकट तयार होते . असा दरवाजा वास्तुशाश्त्र प्रमाणे अशुभ समजला जातो .

उंबरठा हा कशाप्रकारे असावा ?

उंबरठा हा शास्त्रानुसार लाकडाचा बसवावा जर लाकडी उंबरठा बसवणे शक्य नसेल तर अशावेळी सफेद संगमरवरी अर्थात मार्बलचा बसवावा . ग्रॅनाईटचा उंबरठा बसवू नये शक्य झाल्यास लाकडामध्ये उंबरठा बसवायचा असेल तर सिसम या लाकडाचा बसवावा कारण की सिसम या लाकडांमध्ये साक्षात लक्ष्मीचा वास हा असतो त्यामुळे तो उंबरठा आपल्या घरासाठी लक्ष्मीदायक ठरतो.

उंबरठ्याची पूजा कशी करावी ?

दररोज उंबरठयाच्या दोन्ही बाजूला झेंडूची फुलं अर्पण करावी. तसेच उंबरठ्याच्या बाहेरील बाजूस रांगोळी काढण्याचा प्रयत्न करावा व रांगोळी काढून झाल्यानंतर त्यावरती हळदीकुंकू वाहिला विसरू नये. हळदी कुंकामुळे रांगोळीला पूर्णत्व येते जर रांगोळी काढणे शक्य नसेल तर उंबरठ्याच्या बाहेर एक सरळ रेष मारावी व त्यावर हळदीकुंकू हे वाहावे त्यामुळे बाहेरून येणाऱ्या नकारात्मक शक्तीला अटकाव केला जातो व घरामध्ये सकारात्मकता वाढण्यास मदत होते. उंबरठा हा तुटलेला किंवा भेगा गेलेला नसावा . असेल तर तो त्वरित बदलून घ्यावा . उंबरठ्यावरती सणासुदीला अष्टगंधाचा लेप लावावा. त्यामुळे उंबरठ्याला सकारात्मक ऊर्जा प्राप्त होण्यास मदत होते व घरातील वातावरण पवित्र बनते. शक्य झाल्यास दररोज उंबरठा हा गाईच्या गोमुत्राने किंवा गंगाजलाने पुसून घ्यावं. आपल्या घराची हद्द हि आपल्या घरचा उंबरठ्यापासून सुरु होते . बाहेरील व्यक्ती आपल्या घरात प्रवेश करताना प्रथम उंबरठा ओलांडून आपल्या घरात प्रवेश करतो . त्याचा नकारात्मक विचारण्याचे परिवर्तन करून सकारात्मक विचार करण्याची ताकद हा वास्तूमधील आपला उंबरठा करत असतो .. उंबरठायची शोभा वाढवण्यासाठी लाकडी उंबरठ्यावर विविध ऊर्जादायी प्रतीक आपण कोरून घेऊ शकता . उदाहरणार्थ स्वस्तिक , लक्ष्मीची पावलं , अष्टदल कमळ अशा ऊर्जादायी प्रतीकांचा वापर आपण उंबरठ्यावर करून उंबरठ्याची ऊर्जा वाढवू शकता .

उंबरठ्याचे महत्त्व

उंबरठ्यावर हे काम कधीहि करू नका

उंबरठ्यावरती उभे राहून कोणतेही व्यवहार करू नये. ओळखीची व्यक्तीला घराचा आत बोलावून व्यवहार करावा परंतु उंबरठ्याचं मधोमध उभे राहून व्यवहार करू नये . बाहेरील व्यक्तीशी व्यवहार करण्याचा संबंध आल्यास एकतर उंबरठ्याच्या बाहेरच्या बाजूला किंवा उंबरठ्याच्या आतल्या बाजूला व्यवहार हा पूर्ण करावा . उंबरठ्यावर पाय ठेवून उभे राहून बाहेरील व्यक्तीशी बोलणे हे शक्यतो टाळावे . पाहुण्यांचे स्वागत हे आपल्या उंबरठ्याच्या आतून आणि निरोप उंबरठ्याच्या बाहेरून दिला पाहिजे..

वास्तुशाश्त्रानुसार आपल्या घराचे परीक्षण करून घेण्यासाठी किंवा नवीन घराचा प्लॅन काढून घेण्यासाठी ,आपण आम्हाला खाली दिलेल्या नंबर वर संपर्क साधू शकता.                                                                               धन्यवाद ,                                                                      श्री. मनोज श्रीमंत ताजणे                                          91366 38039

1 thought on “वास्तुशाश्त्रानुसार उंबरठ्याचे महत्त्व”

  1. खूपच सुंदर माहिती आणि व्हिडिओ पण आतिषय सुंदर आहे. जयश्रीराम

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top