घर बांधताना स्वयंपाकघराला महत्त्व का आहे?

स्वयंपाकघर (किचन) हे भारतीय घरांमध्ये खूप महत्त्वाचे स्थान आहे. घरातील स्त्रीवर्गाला  दिवसभराची ऊर्जा याच ठिकाणावरून मिळते. त्यामुळे आरोग्यासाठी हे ठिकाण फार उपयुक्त मानले जाते.

घरातील सुख आणि आरोग्यासाठी स्वयंपाकघर महत्वाची भूमिका बजावते. घरात अनेक प्रकारची उर्जा पसरलेली असते परंतु किचनमध्ये ती उर्जा साठते – चांगली की वाईट हे वास्तु नियमानुसार ठरते.

वास्तुशास्त्रात स्वयंपाकघरासाठी काही दिशा व नियम दिले आहेत. जर तुम्हाला तुमचं जीवन सुंदर आणि व्यवस्थित करायचं असेल, तर स्वयंपाकघर वास्तुशाश्त्रानुसार बांधावे.

पूजाघरानंतर किचनला घरातील  दुसरं पवित्र स्थान मानलं जातं. त्यामुळे किचन  योग्य स्थानावर असणे हे घरातील भरभराटीसाठी आवश्यक आहे.

स्वयंपाक करताना गृहिणीने कोणत्या दिशेला तोंड असावे, हे देखील ठरवलेले आहे – यामुळे आरोग्य, पैसा आणि चांगला आर्थिक प्रवाह  घरात वास करतो. 

वास्तु तज्ञांचे म्हणणे आहे की, वास्तुनुसार बनवलेले किचन घरात शांतता, धन-संपत्ती आणि समृद्धी घेऊन येते. अशा घरांमध्ये वाईट शक्ती प्रवेश करत नाहीत.वास्तुशास्त्राचे पालन केलेली स्वयंपाकगृह अनेक पिढ्यांसाठी शुभ मानली गेली आहेत.घातक आजार, मृत्यू, वाईट उर्जा, आर्थिक तोटा यापासून सुरक्षित राहण्यासाठी किचन वास्तु पाळणे खूप आवश्यक आहे.

स्वयंपाकघरात ठेवलेली प्रत्येक वस्तू, उपकरण यांचे स्थान महत्त्वाचे आहे. घरातील आर्थिक अडचणी, तोटा किंवा संकटे अनेकदा किचनच्या चुकीच्या रचनेमुळे येतात.म्हणूनच, घर बांधण्याआधी वास्तुचे नियम पाळावेत.

किचन वास्तु टिप्स

किचनचा प्लॅटफॉर्म दक्षिण-पश्चिम (अग्नी कोन) दिशेला असावा. 

  •  मिक्सर, ग्राइंडर, मायक्रोवेव्ह हे दक्षिण दिशेच्या भिंतीवर ठेवावेत.
  • हलकी भांडी उत्तर किंवा पश्चिम दिशेला ठेवावीत.
  • फ्रिज दक्षिण-पूर्व, दक्षिण किंवा पश्चिम दिशेला ठेवावा.
  • किचनच्या भिंती व फरशांना पिवळा, केशरी, गुलाबी, चॉकलेटी किंवा लाल रंग द्यावा.
  • स्वयंपाक करताना पूर्वेकडे तोंड करून स्वयंपाक करावा. यामुळे घरातील स्त्रीवर्गाचे आरोग्य चांगले राहते.
  • धान्य, डाळी, मीठ, मसाले दक्षिण किंवा पश्चिम दिशेला ठेवावेत.
  • स्वयंपाकघर पूजाघराच्या खाली असू नये.
  • किचनची योग्य रचना केल्यास चांगले आरोग्य संपदा प्राप्त होते. 
  • सिंक/वॉशबेसिन हे पश्चिम किंवा ईशान्य भिंतीवर लावावे.
  • पिण्याचे पाणी व भांडी ईशान्य किंवा उत्तर दिशेला ठेवावीत.
  • गॅस स्टोव्ह किंवा शेगडी दक्षिण-पश्चिम कोपऱ्यात ठेवावी, पण भिंतीपासून थोडी दूर असावी.
  • घरात सुखशांती टिकवण्यासाठी पहिलं जेवण देवाला नैवेद्य (प्रसाद) म्हणून अर्पण करावे.
  • किचन टॉयलेटच्या वर किंवा खाली असू नये.
  • उत्तर दिशेला किचन असल्यास (ही कुबेराची दिशा आहे), घराचा  खर्च नियंत्रणाबाहेर जातो.
  • काळा रंग किचनमध्ये वापरू नये.
  • ईशान्य दिशेला किचन असू नये, कारण यामुळे कुटुंबात वाद-विवाद  व  असाध्य आजार  वाढतात.
  • किचन बेडरूमच्या वर किंवा खाली असू नये.
  • रात्री झोपण्याआधी किचन आणि भांडी स्वच्छ करावीत. वास्तुशाश्त्र विषयी माहिती घेण्यासाठी आपण आमचा युट्युब  चॅनेल ला भेट देऊ शकता.                                                                          वास्तुशाश्त्रानुसार आपल्या घराचे परीक्षण करून घेण्यासाठी किंवा नवीन घराचा प्लॅन काढून घेण्यासाठी ,आपण आम्हाला खाली दिलेल्या नंबर वर संपर्क साधू शकता.                                          धन्यवाद ,                                                            श्री. मनोज श्रीमंत ताजणे                                          91366 38039
 
Scroll to Top