वास्तूमध्ये जिना बांधताना महत्त्वाचे वास्तू नियम लक्षात घेणं आवश्यक आहै.

आपण घर बांधताना नेहमी घराचा मुख्य दरवाजा , हॉल , किचन, बेडरूम हे वास्तुशाश्त्रानुसार योग्य दिशेला असावे याचा मुख्य विचार करतो. पण बऱ्याच वेळा  आपण घरातील जिना या महत्वाचा भागाकडे दुर्लक्ष करतो. वास्तुशास्त्रानुसार जिना हा घरातील एक शक्तीशाली ऊर्जा केंद्र मानले जाते. जर घरातील जिना हा वास्तुशाश्त्रानुसार बांधला गेला असेल तर तो जिना आपल्याला आरोग्य, समृद्धी, सुख, यश, पैसा आणि चांगले नाते संबंध प्रस्थापित करण्यास मदत करतो. पण या विरुद्ध चुकीच्या दिशेला बांधला गेलेला जिना वास्तूमध्ये नकारात्मक परिणाम घडवू शकते.  

वास्तुशाश्त्रानुसार जिन्याची दिशा , आकार , संख्या , जागेतील अंतर आणि जिना  दिसतो  कसा  याला खूप महत्त्व आहे. जिना हा चौकोनी किंवा आयताकृती आकाराचा असायला हवा  व तो  योग्य कोनात वळणारा असावा. शक्यतो गोलाकार आकाराचा जिना बांधणे टाळावे . त्यामुळे घरात अशांतता निर्माण होते.

जिना हा वास्तूच्या   नैऋत्य , दक्षिण किंवा पश्चिम दिशेला बांधलेला असावा त्यामुळे घरात संपन्नता वाढण्यास मदत होते . उत्तर , ईशान्य किंवा पूर्व दिशेला चुकणंही जिना बांधणे टाळावे . नाहीतर आपल्याला आर्थिक नुकसान , असाध्य रोग , नातेसंबंध या मध्ये नुकसान होताना दिसू शकतो  परंतु जागेअभावी जिना हा ईशान्य , पूर्व , उत्तर दिशेला बांधायचं झाल्यास तो शकतो लाकडी असावा.

जिना चढताना तो घड्याळाच्या काट्याच्या दिशेने (clockwise) फिरणारा असावा . मुख्य दरवाजा समोर चढणारा जिना असू नये . जिना हा घराचा मधोमध अर्थातच ब्रह्मस्थान मध्ये असू नये असल्यास हा वास्तुशाश्त्रामध्ये महादोष सांगितला आहै. असल्यास त्यावर कोणता उपाय न करता तो तेथून काढणे हा एक उत्तम पर्याय आहै. जिन्यामधील पायऱ्यांची संख्या विषम (odd number) असावी आणि ती शून्यावर (0) संपणारी नसावी.तसेच वरच्या मजल्यावर जाण्यासाठी आणि बेसमेंटमध्ये (तळमजल्यात) जाण्यासाठी सामायिक (common ) जिना असू नये . दोन्ही जिने हे वेगवेगळे असावे. जिना हा घराच्या मुख्य दरवाजातून दिसू नये आणि तो  मुख्य दरवाजासमोर थेट असू नये. अशा स्थितीमुळे घरातील संतुलन आणि सौहार्द बिघडते.

जिन्या खाली काय असू नये

  • स्वयंपाकघर (किचन) बांधण्याचे  टाळावे.
  • पूजाघर बांधू नये.
  • लॉकर, तिजोरी जिन्याखाली  ठेवू नये.
  • जिन्या खाली झोपण्याचा पलंग ठेऊ नये.
  • वर्कस्टेशन (कामाची जागा) जिन्या खाली टाळावे.
  • जिन्याखालची जागा फक्त सामान ठेवण्यासाठी (स्टोरेजसाठी) वापरावी. हे  नियम पाळल्यास घरात सौख्य, आरोग्य, यश, आणि समृद्धी प्राप्त होते.

वास्तुशाश्त्रानुसार आपल्या घराचे परीक्षण करून घेण्यासाठी किंवा नवीन घराचा प्लॅन काढून घेण्यासाठी ,आपण आम्हाला खाली दिलेल्या नंबर वर संपर्क साधू शकता. धन्यवाद ,

श्री. मनोज श्रीमंत ताजणे 91366 3803

Scroll to Top