वास्तुशास्त्र आपल्या आरोग्यापासून ते नातेसंबंध आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आर्थिक स्थितीवरही प्रभाव टाकते. पैसा योग्य पद्धतीने येणे आणि गुंतवणूक चांगली असणे, हे सुखी आणि समृद्ध जीवनासाठी आवश्यक आहे.
खूप वेळा असं दिसून येतं की काही व्यक्तींना चांगले उत्पन्न असूनही खर्च, कर्ज किंवा पैशांची टंचाई भासते. काहीजण वारसाहक्काने मिळालेल्या संपत्तीमुळे श्रीमंत असतात, तरीही त्यांच्या आयुष्यात एकप्रकारचा एकांतपणा जाणवतो. या समस्या अनेकदा चुकीच्या वास्तु रचनेमुळे होतात.
जर कोणालाही पैशांच्या बाबतीत आर्थिक समस्या जाणवत असतील, तर त्यांनी आपल्या घराची वास्तुशास्त्रानुसार योग्य रचना आहे का, हे नक्की पाहावे. वास्तुशास्त्रात दिशा व पंचतत्त्व यांचे खूप महत्त्व आहे. उत्तर व ईशान्य यावर जलतत्त्व , पूर्व व आग्नेय यावर अग्नीतत्व , दक्षिण व नैऋत्य यावर पृथ्वीतत्त्व तर पश्चिम व वायव्य ह्यावर वायुतत्व वास करत असते आणि वास्तूचा मध्यभागी अर्थातच ब्रह्मस्थानावर आकाशतत्व विराजमान असते.

आर्थिक दृष्टिकोनातून महत्त्वाच्या वास्तु टिप्स:
मुख्य दरवाजा (Main Door):
घराचा मुख्य दरवाजा वास्तुशाश्त्रनुसार योग्य पदांमध्ये असणे अतिशय लाभदायक ठरते.
- उत्तर दिशेकडील मुख्य दरवाजा हा मुख्य किंवा भल्लाट या पदामध्ये असावा.
- पूर्व दिशेकडील मुख्य दरवाजा हा जयंत किंवा इंद्र या पदामध्ये असावा.
- दक्षिण दिशेकडील मुख्य दरवाजा हा वितथ किंवा गृहक्षत या पदामध्ये असावा.
- पश्चिम दिशेकडील मुख्य दरवाजा हा सुग्रीव किंवा पुष्पदंत या पदामध्ये असावा.
- दक्षिण दिशेचा पदा व्यतिरिक्त मुख्य दरवाजा टाळावा.
- वास्तूमध्ये एका सरळ रेषेत दोनपेक्षा अधिक दरवाजे नसावेत.
- अशुभ स्थानातील प्रवेशद्वार त्यांच्या अशुभस्थान तीव्रतेनुसार त्या ठिकाणी वास्तव्य करण्यास त्यानुसार फळे देत असते.
उत्तर व ईशान्य दिशा:
- उत्तर दिशा धनाचे दैवत कुबेर यांची दिशा मानली जाते.
- उत्तर व ईशान्य दिशा जलतत्वाची असून ती व्यक्तीच्या आर्थिक स्थितीचे प्रतीक मानली जाते.
- जर या दिशांमध्ये जडत्व , कट किंवा टॉयलेट येत असतील, तर पैशाच्या प्रवाहात अडथळे येतात. अशा वेळी या दिशेत एक लहान फाउंटन किंवा अॅक्वेरियम ठेवले तर फायदा होतो.
- ह्या दिशेला सफेद किंवा हलका निळा रंगाचा वापर करून आपल्या घरामध्ये आर्थिक समृद्धी वाढवू शकता.
तिजोरी व महत्वाचे कागदपत्रे:
- तिजोरी, रोकड, दागिने, महत्त्वाचे कागदपत्रे उत्तर दिशेकडे तोंड करून ठेवावीत.
- नैऋत्य दिशेचा कोपऱ्यात तिजोरी ठेवावी.
- दक्षिण किंवा पश्चिमेकडे उघडणाऱ्या तिजोरीमुळे अनावश्यक खर्च होतो.
- उत्तर दिशेकडे उघडणारी तिजोरी हि पैशाची बचत करते .
देवघर:
- घरातील देवघर नेहमी घराचा उत्तर-पूर्व वा ईशान्य भागात (उत्तर-पूर्व) असावे.
- घरातील देवघर नेहमी घराचा उत्तर-पूर्व वा ईशान्य भागात (उत्तर-पूर्व) असावे.
- घरातील देवघर अशा जागी बनवावे जेथे दिवसभरात थोडया वेळासाठी तरी सूर्यप्रकाश अवश्य पोहोचत असेल.
- देवघरामध्ये मृत पूर्वजांचे फोटो/प्रतिमा लाऊ नयेत.
- देवघराजवळ किंवा वरती शौचालाय असू नये.
स्वयंपाकघर कसे असावे :
- स्वयंपाकघर म्हणजे अग्नीतत्वाचे स्थान , हे आग्नेय दिशेमध्ये असणे अत्यावश्यक आहॆ .
- स्वयंपाक घरात पूर्वेला खिडकीची रचना असावी . त्यातून आत येणारी किरणे स्रियांच्या शाररिक व मानसिक आरोग्यासाठी अतिशय लाभदायक ठरतात.
- मुख्य किचन ओटा हा पूर्वेस व आग्नेय कोपऱ्यात असावा व स्वयंपाक करताना पूर्वाभिमुख करावा.
- मुख्य किचन ओटा हा पूर्वेस व आग्नेय कोपऱ्यात असावा व स्वयंपाक करताना पूर्वाभिमुख करावा.
- स्वयंपाक घरातील ओटा हा ग्रॅनाइटचा नसावा . ग्रॅनाईट हा उष्णता शोषून घेत नाही त्यामुळे स्त्रियां मध्ये पोटासंबंधी आजार उध्दभवतात . त्याच्याऐवजी संगमरवर (marble ) चा वापर करावा.
वास्तुशास्त्राच्या साध्या-सोप्या उपायांनी आपल्या आर्थिक अडचणी दूर करता येतात. योग्य दिशेची निवड, नकारात्मक उर्जा टाळणे आणि घरातील काही गोष्टींची योग्य रचना केल्यास धनवृद्धी, यश आणि समृद्धी निश्चितच प्राप्त होते.
वास्तुशाश्त्रानुसार आपल्या घराचे परीक्षण करून घेण्यासाठी किंवा नवीन घराचा प्लॅन काढून घेण्यासाठी, आपण आम्हाला खाली दिलेल्या नंबर वर संपर्क साधू शकता.
धन्यवाद , श्री. मनोज श्रीमंत ताजणे 91366 3803