नवीन घर घेताना या ५ गोष्टी, तुम्हाला मिळून देतील सुख- समृद्धीची प्राप्ती

 नवीन घर घेताना वास्तुशास्त्र अनुसार काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घेणे अत्यंत आवश्यक आहै. त्यामुळे घरामध्ये सुख,शांती समृद्धी आणि आनंदी वातावरण तयार होण्यास मदत होते. पुढे दिलेल्या ५ महत्वाचा वास्तू टिप्स लक्षात घेतल्या , तर घरामध्ये धन-धान्याची वाढ आणि सकारात्मकता ऊर्जा वाढलेला प्रभाव आपणास नक्की पाहायला मिळू शकेल.                                                     

१. वास्तुशाश्त्रानुसार घराच्या मुख्य दरवाज्याचे स्थान (Main Door)

वास्तुशास्त्रनुसार घराचा मुख्य दरवाजाची प्रत्येक मुख्य दिशेला  २ अशी एकूण ८ शुभ पद सांगितली गेली आहे.  उत्तर या दिशेकडे मुख्य, भल्लाट   सोम  हे पद, दक्षिण दिशेकडे वितथ व गृहशत, तर पूर्व दिशेकडे जयंत व इंद्र हे पद व पश्चिम दिशेकडे सुग्रीव व पुष्पदंत या आठ पदांपैकी एका पदांमध्ये घराचा मुख्य दरवाजा करण्याचे सांगितले आहे. जर मुख्य दरवाजा पूर्व, उत्तर, पश्चिम दिशेमध्ये असून तो योग्य पदांमध्ये नसेल, तर त्यावरती आपण वास्तुशाश्त्रानुसार उपाय करून मुख्य दरवाजाला सकारात्मक करू शकतो.  परंतु दक्षिण देशातील मुख्य दरवाजा हा दक्षिणेतील सांगितलेल्या पदाव्यतिरिक्त येत असेल, तर अशावेळी योग्य तो उपाय करूनही घराचा मुख्य दरवाजा लाभदायी ठरत नाही. म्हणून घर घेताना शक्यतो घराचा मुख्य दरवाजा पूर्व, उत्तर, पश्चिम या दिशेकडे घेण्यात यावा, शक्यतो दक्षिण दिशेतील दरवाजा घेण्याचे टाळावे.     

२. स्वयंपाक घराची दिशा (kitchen)

 स्वयंपाकघर म्हणजे अग्नीतत्वाचे स्थान, हे आग्नेय दिशेमध्ये असणे अत्यावश्यक आहॆ. सकाळी सूर्याची किरणे ४५ अंश पूर्ण करून आग्नेय प्रभागात प्रवेश करतात . त्यावेळची इन्फ्रारेड किरणे हि स्वयंपाकघराचे निर्जंतुकीकरण करतात व अन्न पदार्थांचे सत्व वाढवण्यास लाभदायक ठरतात. स्वयंपाक घरात पूर्वेला खिडकीची रचना असावी. त्यातून आत येणारी किरणे स्रियांच्या शाररिक व मानसिक आरोग्यासाठी अतिशय लाभदायक ठरतात. मुख्य किचन ओटा हा पूर्वेस व आग्नेय कोपऱ्यात असावा व स्वयंपाक करताना पूर्वाभिमुख करावा. स्वयंपाक घरातील ओटा हा ग्रॅनाइटचा नसावा . ग्रॅनाईट हा उष्णता शोषून घेत नाही त्यामुळे स्त्रियां मध्ये पोटासंबंधी आजार उध्दभवतात . त्याच्याऐवजी संगमरवर  (marble ) चा वापर करावा. वायव्य दिशेतील स्वयंपाक घर उत्तम समजले जाते कारण अग्नी पेटवण्यासाठी वायूची आवश्यकता लागते, याठिकाणी पश्चिम दिशेला ओटा असावा. म्हणूनच स्वयंपाकघर हे आग्नेय किंवा वायव्य दिशेला असावे.   

३. घरामध्ये येणारा नैसर्गिक प्रकाशझोत

 वास्तुशास्त्रानुसार पूर्व दिशाही प्राणिक ऊर्जेची उगम स्त्रोत तर उत्तर दिशा ही जैविक ऊर्जेचा उगम स्त्रोत असते. याविरुद्ध दक्षिण व पश्चिम या दिशा अस्त दिशा म्हणून ओळखल्या जातात. दिशांच्या उगम व अस्त  गुणांनुसार  त्यांची शुभत्व ठरते. उत्तरेकडील व पूर्वेकडील दोष उगम दिशेतील दोष असल्याने त्यांचा परिणाम हळूहळू होतो.  तर दक्षिण पश्चिमेतील दोष अस्त दिशेतील असल्याने त्यांचा परिणाम तात्काळ दिसतो. त्यामुळे दक्षिण पश्चिमेतील दोष ताबडतोब काढणे आवश्यक आहे. त्यामुळे नवीन घर घेताना पूर्व व उत्तर दिशा जास्तीत जास्त मोकळी व जास्तीत जास्त खिडक्यांची रचना असावी.  याविरुद्ध दक्षिण पश्चिम ही बंद असावी व उत्तर व पूर्व दिशेच्या मानाने येथे कमी खिडक्या असाव्यात.

४. बाथरूम आणि टॉयलेट

 गणितामध्ये ज्याप्रमाणे शून्याला महत्त्व आहे त्याप्रमाणे वास्तुशास्त्रात टॉयलेट चे महत्व आहे.  जर टॉयलेटची स्थान चुकीच्या दिशेला झाले, तर त्याची दुष्परिणाम फार मोठ्या प्रमाणावर भोगावे लागतात. टॉयलेट हे उत्तर ईशान्य व पूर्व दिशेला कधी असू नये.  हा वास्तुशास्त्रामधील महादोष समजला जातो. त्यातून धननाश अनारोग्य नोकरी धंद्यात अपयश प्राप्त होते. ईशान्य दिशेला अंडरग्राउंड वॉटर टॅंक ही शुभ मानले जाते. सेफ्टी टॅंक व टॉयलेट ची योग्य दिशाही वायव्य किंवा पश्चिम दिशेला असावी.  कारण सूर्यप्रकाशातील अति तीव्र इन्फ्रारेड किरण जंतुनाशक म्हणून काम करतात. तर वायव्येचे वायु तत्व दुर्गंधी वाहून नेण्याच्या दृष्टीने फार चांगली भूमिका पार पडतात. बाथरूम हे पूर्व , उत्तर किंवा ईशान्यला दिशेला चालू शकते. आग्नेय दिशेतील टॉयलेट हे आर्थिक नुकसान मोट्या प्रमाणावर करते. म्हणूनच नवीन घर घेताना बाथरूम आणि टॉयलेट विचार करणे अत्यंत आवश्यक आहै . 

५. झोपण्याची दिशा अर्थात बेडरूम

 दिवसभर काम केल्यानंतर विश्रांती घेण्याची जागा अर्थातच बेडरूम. दिवसातील सात ते आठ तास आपण बेडरूम मध्ये वास्तव्य करतो. घरातील कर्त्या पुरुषाचे स्थैर्य आणि बेडरूम याचा फार मोठा संबंध आहे. वास्तुशास्त्रानुसार घरातील कर्त्या पुरुषाचा बेडरूम हा साऊथ वेस्ट अर्थातच नैऋत्य प्रभागात असावा.  कारण की नैऋत्य अर्थातच पृथ्वीतत्व आपल्या वास्तूची जडत्व हे मुख्यतः वास्तूचे नैऋत्य प्रभागात सामावलेले असते. वास्तूमध्ये जेवढे जडत्व तेवढी त्या वास्तूची स्थिरता अधिक समजली जाते. अशावेळी बेडरूम हा नैऋत्येला असल्या कारणाने वास्तूमध्ये जडत्व हे मोठ्या प्रमाणावर प्राप्त होते व घरातील कर्त्या पुरुषाला स्थैर्य व आत्मविश्वास वास्तूच्या माध्यमातून प्राप्त होतो व प्रगतीचे मार्ग हे खुले होतात. घरातील ज्येष्ठ अर्थात वयस्कर लोकांचा बेडरूम हा घरामध्ये ईशान्य दिशेला असावा. आग्नेय दिशेकडील बेडरूम पती-पत्नीसाठी निषेध मानली गेलेली आहे. या बेडरूम मध्ये पती-पत्नीमध्ये वाद निर्माण होतात व शारीरिक आजार उद्भवतात. अविवाहित मुला-मुलींसाठी पूर्व दिशेचा किंवा आग्नेय दिशेचा बेडरूम चा वापर करू शकतात. विवाहयोग्य झालेल्या मुलींसाठी वायव्य दिशेचा बेडरूमचा वापर करावा त्यामुळे विवाह योग लवकर जमतात.वरील गोष्टीचा विचार घेतल्यास, घरामध्ये एक सकारात्मक ऊर्जा तयार होण्यास मदत मिळते त्यातून घरामध्ये सुख समृद्धी आणि शांती प्रस्थापित होते. 

वास्तुशाश्त्रानुसार आपल्या घराचे परीक्षण करून घेण्यासाठी किंवा नवीन घराचा प्लॅन काढून घेण्यासाठी, आपण आम्हाला खाली दिलेल्या नंबर वर संपर्क साधू शकता.

 धन्यवाद , 

 श्री. मनोज श्रीमंत ताजणे                                                 

Scroll to Top