देवघरामध्ये कोणते नियम पाळावे

आपण देवघरामध्ये हे नियम पाळता का ?

१) घरातील देवघर नेहमी घराचा उत्तर-पूर्व वा ईशान्य भागात असावे. त्यातही ईशान्य दिशा सर्वश्रेष्ठ ठरते.

२) देवघर पश्चिम किंवा दक्षिण दिशेत नसले पाहिजे.

३) घरातील देवघरात जास्त मोठया देवप्रतिमा ठेऊ नयेत. त्या ४ इंचापेक्षा जास्त मोठया नसाव्यात.

४) घरातील देवपूजा करणाऱ्या व्यक्तीचे तोंड पूर्व किंवा उत्तर दिशेकडे असणे फारच शुभ ठरते.

५) देवघराची जागा अशी निवडावी कि जेथे दिवसभरात थोडया वेळासाठी तरी सूर्यप्रकाश अवश्य पोहोचत असेल.

६) देवपुजेमध्ये शिळी फुले, पाने अर्पण करू नयेत.

७) देवघरामध्ये मृत पूर्वजांचे फोटो/प्रतिमा लाऊ नयेत.

८) देवघराजवळ किंवा वरती शौचालाय असू नये.

९) स्वयंपाकघरात देवघर असू नये.

१०) एकाच देवाच्या दोन अगर जास्त मूर्ती पूजेत असू नयेत.

११) दत्तक गेलेल्या घराण्याचे अगर बुडीत घराण्याचे (वंशज नसलेले घराणे) देव देवघरात अजिबात पूजू नयेत. ते सर्वच विधिवत विसर्जन करून नवीन देव करावेत

१२) देवघर असणाऱ्या जागेची साफसफाई रोजच्या रोज करावी.

१३) देवघरामध्ये मसाला अगरबत्तीचा वापर करावा चुकूनही काळ्या रंगाचा अगरबत्ती वापरू नये .

१४) देवघर बाहेरील व्यक्तीला दिसू नये अशा जागी स्थापित करावे . शक्य नसल्यास पडदाचे प्रयोजन करावे.

१५) देवपूजा करताना शंखनाद व घंटानाद करावा .

१६) देवघरामध्ये कुलस्वामी आणि कुलस्वामिनीचे ठाक किंवा फोटो असावा.

वास्तुशाश्त्र विषयी माहिती घेण्यासाठी आपण आमचा यूट्यूब चॅनेल ला भेट देऊ शकता . धन्यवाद 

 
Scroll to Top